माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले भरणे कुटुंबियांचे सांत्वन प्रतिनिधी दत्ता पारेकर




     पुणे :भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व कुटुंबीयांचे भरणेवाडी येथे आज शनिवारी ( दि.2) सांत्वन केले. दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे वृद्धपकाळाने शुक्रवारी निधन झाले.
        भरणे कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी गिरीजाबाई भरणे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मधुकर भरणे, रामचंद्र भरणे, आबासाहेब भरणे व भरणे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने