धुळे –
धुळ्यातील विमा क्षेत्रात कार्यरत असलेले क्षितिज अक्षय छाजेड यांचा मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया)
येथे सन्मान केला जाणार आहे. विमा क्षेत्रात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल हा
सन्मान होणार आहे.
देशातील आघाडीची आर्युविमा कंपनी
आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्सुरन्स तर्फे हा सत्कार करण्यात येणार आहे. छाजेड
त्यासाठी नुकतेच ऑस्ट्रेलिया येथे रवाना झाले असून 01 जुलै ते 08 जुलै या कालावधीत
ते ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहेत.
म्युच्युअल
फंड व विमा क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावल्या बद्दल क्षितिज छाजेड यांना
यापूर्वीही विविध सन्मान प्राप्त झाले आहेत. क्षितिज छाजेड हे धुळयातील प्रसिध्द
गुंतवणुक सल्लागार प्रा. बन्सीकुमार छाजेड यांचे नातू व अक्षय छाजेड यांचे चिरंजीव
आहेत.
Tags
news
