शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील विकास सोसायटी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या सोसायटीची सदस्य निवडणूक घेण्यात आली होती.
या प्रक्रियेनंतर आता चेअरमन व व्हॉइस चेअरमन यांच्या निवड कार्यक्रम घेण्यात आला त्यात सर्वानुमते उद्योजक मंगलसिंग गिरासे यांचे मोठे बंधू श्री नारायण पंडित सिंग गिरासे यांची चेअरमन पदावर तर प्रभाबाई चंद्रसिंग राजपूत यांची व्हाईस चेअरमन पदावर बिनविरोध निवड करण्यात आले.
सदर निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी पॅनल प्रमुख हिम्मतसिंह उमेदसिंह राजपूत व भोरखेडा ग्रामस्थ व असली ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
या वेळी सहकार पॅनलचे नारायण पंडित गिरासे, प्रभाबाई चंद्रसिंग राजपूत, शिवाजी लोटन राजपूत, सुरेंद्र उदयसिंग राजपूत, रामकृष्ण भोजू धनगर, उखडू गुलाब कोळी, मुरलीधर शंकर धनगर हे उपस्थित होते.
तर नम्रता पॅनलचे विक्रमसिंग पंडितसिंग राजपूत ,किरण रोहिदास राजपूत ,रणजीत कृष्णात राजपूत, दिलीप रघुनाथ राजपूत, सुमनबाई कृष्णा राजपूत हे सदस्य उपस्थित होते.
निवड प्रक्रिया नंतर बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांच्या स्वागत व सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील कामकाजासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
