शहरात घर फोडी करणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकांसह 1लाख ४७ हजार रुपयांच्या मुद्देमाल हस्तगतशिरपूर शहर पथकाची कामगिरी चोरीचे दागिने विकत घेणाऱ्यांवर कारवाईकडे नागरिकांचे लक्ष




शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात मागील काळात मोठ्या प्रमाणावर घरफोळ्या झाल्या होत्या व त्या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. याच गुन्ह्यातील काही गुन्ह्यांच्या उलगडा करण्यात शहर पोलिसांना यश आले असून विधी संघर्ष २ बालकांसह १ लाख 47 हजार 600 रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करून पुढील तपास पोलीस करत आहेत.


सदरच्या प्रकरणात या बालकांनी दिलेल्या कबुली जवाबानुसार शहरातील काही सोनारांनी चोरीचे दागिने विकत घेतल्याच्या देखील संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे छोट्या चोरांना पकडले मात्र मोठ्या चोरांपर्यंत देखील पोलिसांच्या हात जाईल का? यात पुढे काय कारवाई होते याकडे शहरवासी यांचे लक्ष लागून आहे.


याच चोरी प्रकरणाच्या संदर्भात काही भंगारवाले युवकांना देखील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते मात्र त्यांना देखील सोडून देण्यात आले त्यामुळे त्यांच्याकडून काय माहिती प्राप्त झाले व त्यांना का सोडून देण्यात आले याबाबतची माहिती देखील अद्याप गुलदस्त्यात आहे.


शिरपूर शहरात जून महिन्यात दिवसा सलग दोन दिवस घर फोडी चे प्रकार उघडतील आले होते .याबाबत तपास करत असताना शोध पथकाला २ विधी संघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात यश आले व त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला.


 त्यांची सखोल चौकशी केली असता दिलेल्या कबुली जबाब त्यांनी गुन्हा कबूल केला असून त्यांच्याकडून १ लाख 47 हजार 600 रुपयांच्या मूल्यमाला हस्तगत करण्यात आला आहे.


 १७ जून 2022 रोजी शिरपूर शहरातील किरण सोसायटी मधील सिक्स बंगलोरच्या १,३,४,५  क्रमांकाच्या प्लॉटमध्ये वॉशरूमच्या रूम मधील खिडकीच्या काचा फोडून प्लॉटमध्ये प्रवेश करून ७१ हजार रुपयांच्या मुद्देमाल अज्ञात चढताना चोरून नेला होता, पुन्हा १८ जून 2022 रोजी दुपारी पित्रेश्र्वर कॉलनी परिसरातील शारदा नगर मध्ये घराच्या कडी तोडून अज्ञात यांनी घरात प्रवेश करून 27 हजार 250 रुपये किमतीच्या मुद्देमाल लंपास केला होता.


वरील दोन्ही गुन्ह्यांच्या संदर्भात सदर विधीग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील चोरीच्या माल घेणाऱ्या संशयित वर देखील पोलीस काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने