शिरपूर - शिरपूर तालुक्यात झालेल्या पहिल्या टप्प्यात हिसाळे सोसायटीच्या निवडणुकीत नम्रता पॅनल ने 13 पैकी 13 जागा जिंकून विजय मिळवला होता ,तरी आज दि 6/7/2022 रोजी सोसायटीच्या कार्यालयात चेअरमन पदावर निवड करण्यासाठी मिटिंग आयोजित केली होती.
त्यात शिरपूर प.स.माजी उप सभापती श्री नानासो.संजय पाटील यांची चेअरमन पदी व व्हा.चेअरमन पदी श्रो जितेंद्र करणकाळ यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
त्या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून दिलवरसिंग गिरासे व सचिव सखाराम पावरा यांनी काम पाहिले त्या वेळी माजी सरपंच बुधा पावरा , विकास पाटील, प्रदीप पाटील,दिलीप पाटील विश्वासराव देवरे, लोटन पाटील,गोविंद परदेशी,पोलीस पाटील , डॉ ताराचंद जाधव,रतीलाल शिंपी अर्जुन पाटील, नारायण करणकाळ, अरुण शिंपी ,अरविंद पाटील, सुनील पाटील हुकुमचंद पाटील ,गुलाब पाटील व शेतकरी ,सभासद उपस्थित होते.
तसेच नवनिर्वाचित सदस्य श्री संतोष परदेशी, वसंत पाटील,बालकृष्ण पा.दीपक पा, .ज्ञानेश्वर पा.,भिका शिंपी, प्रताप परदेशी, वसंत जाधव सौ स्वाती विकास पाटील, सौ जनाबाई पाटील, , यांच्या सोबत गावकरी व शेतकरी बांधव आणि वी.का.सो. सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.
चेअरमन संजय पाटील यांनी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करून पुढील कालावधीत विविध कार्यकारी सोसायटी च्या कारभारात आवश्यक त्या सुधारणा करून सोसायटीची आर्थिक प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले आहे.
नवनिर्माचित नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना परिसरातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवाय तालुक्याचे आमदार माननीय अमरीश भाई पटेल, माननीय भूपेश भाई पटेल, माननीय आमदार काशीरामजी पावरा, माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांच्यासह अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
