शिरपूर : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत शिरपूर शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा विविध पदावर समावेश करण्यात आला आहे. यात भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष श्री.बबनराव चौधरी यांच्या शिफारसीने शिरपूर येथील संजय रघुनाथ आसापूरे (बारी) यांची भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी निवड क रण्यात आली आहे. सदर निवड ही धुळे येथे दि.३० रोजी उत्तर महाराष्ट्र विभागीय ओबीसी मोर्चा मेळाव्यात श्री.संगमलालजी गुप्ता ओबीसी मोर्चा राष्ट्रीय महामंत्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
सदर निवड ही भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आर.के.माळी यांनी केली आहे. संजय आसापूरे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपामध्ये सक्रीय आहेत. त्यांनी आतापर्यंत भाजपात विविध पदांवर काम केले आहे. सद्या ते बारी समाज तालुकाध्यक्ष, श्री.खंडेराव बाबा ट्रस्ट उपाध्यक्ष आदी विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत शिरपूर मचंट्स बँक, शिरपूर ग्राहक भांडार व इतर संस्थांच्या निवडणूका लढविल्या आहेत. ते भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचीत आहेत. भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी संजय आसापूरे यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री व आमदार श्री.अमरिशभाई पटेल, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.बबनराव चौधरी, आ.श्री.काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष श्री.भुपेशभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नारायण पाटील, जिल्हा सरचिटणीस श्री.अरुण धोबी, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.आर.के.माळी, तालुकाध्यक्ष श्री.किशोर माळी, शहराध्यक्ष श्री.हेमंत पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

