शिरपूर - शिरपूर तालुक्यात किसान सभे कडून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या जे फॉर्म चे वाटप हे राजकीय व्यक्तिमत्व नाही तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून दिले जावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती यासाठी वारंवार त्यांनी निवेदने आंदोलने देखील केली होती. त्या अनुषंगाने आज दिनांक-01 जुलै रोजी .
कृषि दिनाचा औचित्य साधून किसान सभेने दिनांक 26 ते 28रोजी सांगवी ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यात आला . काल दिनांक 30 जून रोजी देखील उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलने व निदर्शने करण्यात आले.
किसान सभेने लाभार्थ्यांसोबत सांगवी वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले शेवटी त्यांच्याही आंदोलनाला यश प्राप्त झाले असून त्यांच्या मागणीनुसार जे फॉर्म चे वाटप हे वनविभागाचे अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
संघटनेच्या संघर्षाला यश प्राप्त झाल्यामुळे त्यांनी विजयी सभा देखील घेतली.
आज दिनांक 01 जुलै रोजी दुपारी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती गंबरे यानी पारसिग संत्रया पावरा,नारसिंग संत्रया पावरा,आपसिग चतरसिग पावरा या किसान सभा सदस्य यांना जे फार्म वाटप करण्यात आले.त्यावेळी,अडॅ.हिरालाल परदेशी
राज्य अध्यक्ष. म.राज्य किसान सभा.डाॅ.किशोर सुर्यवंशी-,काॅ,साहेबराव पाटील, काॅ,वंसतपाटील,,अर्जुन कोळी,शिलेदार पावरा,अडॅ.संतोष पाटील, रामचंद्र पावरा,शिवाजीराव पाटील, गुलाब पावरा,लकडृया पावरा,सतीलाल पावरा,योगेश पावरा,जाड्या पावरा,गुमान पावरा,गेंदाया पावरा,अजय बैसाणे,प्रमोद पाटील, मोठ्या संख्येने आदिवासी महिला,पुरुष याची सांगवी रेंज कार्यालय ते किसान सभा कार्यालयात घोषणांनी परिसर विजयी मिरवणूकी नेदणाणून काढला, किसान सभा कार्यालयासमोर विजयी सभा घेण्यात आली.या सभेस अडॅ.हिरालाल परदेशी, रामचंद्र पावरा,डाॅ.किशोर सुर्यवंशी,अर्जुन कोळी,वंसत पाटील, सतीलाल पावरा,लाभार्थी शेतकरी आपसिग पावरा,यानी,संबंधित केले.
आदिवासी बांधव जे फार्म मिळृयालामुळे आनंदित,होते.अनेक शेतकऱ्यांचा जे फार्म चे अर्ज आर.ए फो,अधिकारी कडे दाखल केले.
