बनावट विदेशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त ,धुळे पोलिसाची कारवाई



धुळे  प्रतिनिधी

शहरातील मोगलाई भागातील फुले नगरात पत्र्याच्या घरातील  बनावट विदेशी दारुचा  कारखाना शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने  उद्ध्वस्त करुन तेथून एक लाखाचे स्पिरीट व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी सात जणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक नितीन देशमुख यांना फुले नगरात बनावट विदेशी दारु तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे 1 जुलै रोजी रात्री 10.40 वाजता पथकाने पत्र्याचे छत असलेल्या घरावर छापा टाकला. तेथे एक लाख सात हजार 730 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्यात स्पिरीटने भरलेला ड्रम, विदेशी मद्याच्या भरलेल्या व खाली बाटल्या, बुच, सील, पिंप, गाळणी, बनावट मद्य निर्मितीसाठी लागणारे साहित्य यांचा समावेश आहे. पथकाने हे साहित्य जप्त केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने