शिरपूर वरचे गाव वडगल्ली येथे आजपासून श्री नर्मदेश्वर महादेव, श्री वटेश्वर हनुमान, श्री गणेश मूर्त्यांचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा व मंदिराचा जिर्णोद्धार




शिरपूर : शहरातील वरचे गाव वडगल्ली परिसरात श्री नर्मदेश्वर महादेव, श्री वटेश्वर हनुमान, श्री गणेश, पार्वती माता, श्री कुर्म भगवान, श्री नंदीश्वर आदी मूर्त्यांचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा व मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा 4 जुलै ते 6 जुलै 2022 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

श्री बालाजी मंदिर वरचे गाव पासून वडगल्ली पर्यंत शोभायात्रा सोमवार दि. 4 जुलै 2022 रोजी दुपारी 4 वाजेपासून काढण्यात येणार आहे. तसेच श्री गणेश पूजन, पंचकर्म, समस्त पीठ स्थापन, हवन अग्नीकर्म असे विविध धार्मिक कार्यक्रम  मंगळवारी 5 जुलै 2022 रोजी आषाढ शुद्ध 6 सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम बुधवारी 6 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन वरचे गाव वड गल्ली परिसरातील समस्त नागरिकांनी व आयोजकांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने