तापी नदीत उडी घेऊन आयटीआय विद्यार्थ्यांची आत्महत्या





शिरपूर - आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या बावीस वर्षीय युवकाने तापी नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना एक जुलै रोजी दुपारी घडली होती. दोन दिवसापासून बेपत्ता युवकाची शोध कार्य सुरू होते. दोन जुलै रोजी शोध कार्य सुरू असतानाच तापी नदी पात्रात त तरुणाच्या मृतदेह आढळून आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील मुंबई आग्रा महामार्गावरील पुलावरून तापी नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना एक जुलै रोजी दुपारी घडली होती. घटनास्थळावर पुलावर बॅग व कागदपत्रे आढळून आली होती. त्यावरून आत्महत्या करणाऱ्या तरुणाची ओळख पटली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईकांनी नाव घेतली असता रितेश विलास सोनवणे वय 22 राहणार चांदसे तालुका शिरपूर याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. रितेश दोन

दिवसांपासून घरातून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे त्याने एक जुलै रोजी दुपारी आत्महत्या केली रितेश सोनवणे यांच्या नदीपात्रात शोध सुरू असताना

रितेशच्या मृतदेह आढळून आला मयत रितेश सोनवणे या युवकाच्या मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार रितेश आयटीआयचे शिक्षण घेत होता. तो दोन दिवसापासून घरातून बेपत्ता होता व त्याने एक जुलै रोजी तापी नदी पात्रात सावळदे पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. सावळदे येथील तापी नदी पुलावरून सतत होणाऱ्या आत्महत्येच्या घटना पाहता विविध संघटनांनी येथे कठडे बसवण्याची मागणी केली आहे. परंतु त्या मागणीकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने