समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा मार्फत महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री यांना अपंगाच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले .निवेदनात म्हटले आहे की, शासनाने दिव्यांगाच्या बाबतीत आज पावतो कोणतेही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यांना शासकीय कार्यालयापासून तर समाजापर्यंत घृनेच्या नजरेने बघितले जाते. निर्वाचन आयोगाकडून लोकप्रतिनिधींच्या सुद्धा कायद्यानुसार तरतूद केलेली नाही .शासनाला दिव्यांगा बाबत खास कायद्यात तरतूद करावी .जेणेकरून दिव्यांगांना आधार मिळेल .त्यांना शासकीय निमशासकीय नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात यावे. दिव्यांगांना कोणताही समाजाचा आधार नसल्यामुळे त्यांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे .त्यामुळे शासनाने खंबीरपणे दिव्यांगा सोबत उभे राहून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करून त्यांना न्याय व त्यांचे हरवलेले हक्क देण्यात यावेत. देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये भारतीय जनगणना च्या कायद्यानुसार अपंगाची जनगणना करून निवडणूक आयोगामार्फत दहा टक्के प्रतिनिधित्व देण्यात यावे त्याचप्रमाणे शासनाच्या विविध मंडळावर प्रतिनिधी अधिस्वीकृती देण्यात यावी .दिव्यांग मनोबल वाढवणे व त्यांचे स्वामित्व घडविण्याचे विविध योजना तयार करून थांबविण्यात यावे, भारतीय विधीसाठी मजबूत असे संशोधन करून कायद्याची तरतूद करावे ,दिव्यांगासाठी ग्राम स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत नोंद करून स्वयंरोजगारासाठी व शासकीय नोकरीची सोय करून देण्यात यावे, दिव्यांगासाठी शहरी स्तरावर शासकीय योजनेद्वारे ऋणानुबंध या योजनेची जात ,धर्म, पंथ यांच्या सलोखा ठेवून विवाह मेळावे घेऊन पुरस्कृत करावे ,दिव्यांगांना.10000 उदरनिर्वाह मासिक भत्ता म्हणून योग्य ती तरतूद करावी ,दिव्यांगाना मोफत घरे बांधून तीन एकर तजमीन देण्यात यावी ,दिव्यांगांना शासकीय कार्यालयात कोणते प्रकारची पिळवणूक होऊ नये अशी तरतूद करून कार्यालयामार्फत योग्य सेवा पुरविण्यात यावी ,दिव्यांगांना प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षणाची सोय करण्यात यावी, दिव्यांगाना स्पर्धात्मक परीक्षेची सोय करून पुरस्कृत करावे ,दिव्यांगांना भविष्य निर्वाह निधी शासनाकडून तरतूद करावी, दिव्यांगांना त्याचे पात्रतेनुसार स्वयंरोजगारासाठी गाळे उपलब्ध करून देण्यासाठी दोन लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा ,उच्चस्तरीय वैद्यकीय सेवा खाजगी रुग्णालयात विनामूल्य देण्यात यावे ,व इतर दिव्यांगाच्या मागण्यांची शासनान तरतूद करावी इत्यादी मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला. निवेदन देताना अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटनेचे संस्थापक/ सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार ,अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे , जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स चे भंडारा जिल्हाध्यक्ष कुलदीप गंधे, मधुकर कोहाडे ,हरिदास बोरघरे ,संजय किरणापुरे ,राजू उपरीकर ,मयाराम टेकाम ,अशोक गायधने, दीलीप बुरडे ,धनराज मेश्राम, प्रमोद डोंगरे ,दिलीप नेवारे, ईश्वर बघेले, गया उपरीकर, सुनील पोटभरे ,विनोद चिंधालोरे, सोनाली लांजेवार, किशोर लांजेवार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
Tags
news
