आर.सी. पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालयात पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न.



 *शिरपूर*- येथील आर. सी. पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालयात पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. सदर प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल परब यांनी सरस्वती पूजन तसेच पुस्तक प्रदर्शन दालनाचे  रिबीन कापून उद्घाटन केले.   
 सदर पुस्तक प्रदर्शनात  विविध विषयावरील पुस्तकांची विद्यार्थ्यांनी  पाहणी केली. भाषेतील साहित्य प्रकारानुसार विविध पुस्तकांची विभागणी करण्यात आली होती. विविध पुस्तकांच्या विभागांसाठी विद्यार्थी निवेदक यांची नेमणूक करण्यात आली होती. कथा संग्रह, काव्यसंग्रह, नाटक, विद्यार्थी निवेदक यांनी साहित्य प्रकारानुसार माहिती विशद केली. तसेच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांची पाहणी केली तसेच माहिती मिळवली.  सदर प्रदर्शनात  सुविचार, लेखकांचे, संतांचे छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते.  विद्यार्थ्यांनी प्रत्येक पुस्तकाची पाहणी करून माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच आनंद दिसून आला. सदर कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अमोल परब सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक शिक्षिकेतर  कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने