शिरपूर न. प. प्राथ. क्र.१ शाळेला ‘जिल्हास्तरीय स्वच्छ शाळा पुरस्कार’ प्रदान

 


शिरपूर : शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ सन २०२१-२२ अंतर्गत शिरपूर वरवाडे नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. १ ने या उपक्रमात सक्रीय सहभाग घेत ५ स्टार मानांकन घेत तसेच १०० पैकी ९४ गुण मिळवत जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार पटकावला. राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त केले आहे. सदर शाळेला जिल्हास्तरीय स्वच्छ शाळा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार श्रीम. भुवनेश्वरी एस. (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.धुळे) यांच्या हस्ते मिळाला. कार्यक्रमाला मोहन देसले (माध्यमिक शिक्षणाधिकारी), राकेश साळुंखे  (प्राथ.शिक्षणाधिकारी), श्रीमती मंजुषा क्षीरसागर (प्राचार्य डायट, धुळे), जे.एस.पाटील (अधिव्याख्याता डायट,धुळे), सी.के.पाटील (गटशिक्षणाधिकारी पं.समिती शिंदखेडा), श्रीमती मनीषा वानखेडे (शि.वि.अधिकारी), श्रीमती भावना पाटील (शि.वि.अधिकारी) तसेच जि.प.कार्यक्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. सदर पुरस्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वंदना प्रमोद रघुवंशी व स्टाफ यांनी स्वीकारला.

विद्यार्थी संख्या वाढ, दिल्ली यांचेकडून मिळालेले शाळासिद्धी ‘अ’ श्रेणी, डिजिटल शाळा, प्रशस्त बालस्नेही इमारत व शालेय परिसराची स्वच्छता तसेच शाळा स्वच्छतेवर आधारित विविध सहशालेय उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे शाळेच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाला.

या यशाबद्दल।माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, माजी नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई  पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, न.प. मुख्याधिकारी तुषार नेरकर, शिक्षण मंडळ सभापती राजेंद्र अग्रवाल, सर्व शिक्षण मंडळ सदस्य, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, रघुनाथ गायकवाड (गटशिक्षणाधिकारी), डॉ. नीता सोनवणे (गट समन्वयक पं.स.शिरपूर), श्रीमती मनीषा वानखेडे (शि.वि.अधिकारी), अनिल बाविस्कर (केंद्रप्रमुख), शिक्षण मंडळ प्रमुख मोहन चौधरी, पां. बा.मा.शालेय परिवार, न.प.प्राथमिक विभागाचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक तसेच न.प. प्री प्रायमरी विभागाचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने