शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रशासनाचा कृषी दिवस साजरा प्रगतशील शेतकरी शिवाजी राजपूत यांच्या कडून बांबूंच्या वाढदिवस व लागवड




शिरपूर प्रतिनिधी - आज ०१ जुलै कृषी दिनाच्या निमित्ताने व कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने धुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कृषी दिवस साजरा करून एक अनोखा सामाजिक संदेश दिला आहे.

शिरपूर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी श्री शिवाजी लोटन सिंग राजपूत हे शेती व्यवसायात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करून पर्यावरण संवर्धनाचे व आधुनिक शेतीचे कास धरून शेती उद्योग करत असतात. त्यांचे वृक्ष लागवडीचे काम अतिशय उल्लेखनीय असून त्यांच्या या अतुलनीय योगदानाला महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने देखील दखल घेऊन त्यांना आजपर्यंत  इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार भारत सरकार, उद्यान पंडित पुरस्कार महाराष्ट्र सरकार, धनश्री पुरस्कार महाराष्ट्र सरकार, वसंतराव नाईक पुरस्कार महाराष्ट्र सरकार, कृषी सन्मान पुरस्कार महाराष्ट्र सरकार, व राष्ट्र भूषण पुरस्कार असे पुरस्कार देऊन त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.



व्यवसायात यापूर्वी देखील त्यांनी नाविन्यपूर्ण अशा सागवान चंदन फळझाडे इत्यादी वृक्षांची लागवड केली आहे. मात्र मागील काही वर्षांपासून त्यांनी आपल्या शेतात 28 एकर क्षेत्रात ०१ जुलै 2020 रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून 19 प्रजातींचे 16 हजार बांबूंच्या वृक्षांची लागवड केली आहे .आणि पुन्हा आज ०१ जुलै 2022 रोजी 22 एकर क्षेत्रात १५ हजार बांबू वृक्षांची लागवड आज मान्यवरांच्या हस्ते कृषी दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. याचबरोबर त्यांनी आपण लावलेल्या बांबूंच्या दुसरा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा केला.





जिल्हा प्रशासनाकडून देखील जिल्हा परिषद कृषी विभाग व वन विभाग यांनी देखील शासनाच्या कृषी दिवस व कै. वसंतराव नाईक यांचे जयंती दिवस शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन साजरा केला आहे.

सदर कार्यक्रमात शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरत पर्यावरण पूरक अशी शेती केली पाहिजे व शेती व्यवसायात नाविन्यपूर्ण प्रयोग करून व वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करून आपली प्रगती साधली पाहिजे याबाबत उपस्थित कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. व भविष्यात शेतकऱ्यांना आपली प्रगती साधायची असेल तर त्यांनी बांबू सारख्या पिकाची लागवड करून आधुनिक शेती केली पाहिजे त्यासाठी शासनाकडून पुरेपूर मदत सहाय्य मिळत असून मार्गदर्शन देखील प्राप्त होत आहे, तरी शेतकऱ्यांनी याबाबत जागृत राहून आधुनिकतेची कास धरावी व शेती व्यवसाय करावा असे मार्गदर्शन कृषी क्षेत्रातील मान्यवरांकडून करण्यात आले.
प्रगतिशील शेतकरी शिवाजी राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बांबू पिकाचे फायदे व त्यापासून मिळणारे उत्पन्न व त्यास उपलब्ध असलेली बाजारपेठ व त्यातून पर्यावरण पूरक असे फायदे व निसर्गाच्या समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन इत्यादी बाबत सखोल माहिती दिली शिवाय त्यांनी शेतकऱ्यांना असे देखील मार्गदर्शन केले की शेतकऱ्यांनी आता अन्नदाता न राहता ऊर्जा दाता झाले पाहिजे व परिवर्तनाची कास धरून आपल्या शेतीत नाविन्यपूर्ण पिकांची लागवड करून प्रगती साधली पाहिजे असा सल्ला त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिला.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून धुळे  जिल्हाधिकारी मा.श्री जलज शर्मा, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषारजी रंधे, दोंडाईचा येथील उद्योगपती मा. सरकार साहेब रावल, प्रादेशिक वनसंरक्षक अधिकारी श्री दिगंबर पगार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री वि.भा.जोशी, उपविभागीय अधिकारी श्री प्रमोद भामरे, जिल्हा परिषद कृषी संवर्धन सभापती श्री संग्रामसिंग पाटील, सामाजिक कार्यकर्ते जयवंत पाडवी, स्वच्छता व पाणीपुरवठाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप पवार, महिला व बालकल्याण सभापती माननीय श्री धरतीताई देवरे, धुळे जिल्हा माहिती अधिकारी मा. श्री विलास बोडके, महाजनकोचे माजी संचालक श्री गुलाबसिंग गिरासे, तालुका वनविभागाचे एसीएफ श्री जाधव,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र सिंह सिसोदिया, शिरपूर वरवडे नगर परिषदेचे माजी अध्यक्ष श्री रावसाहेब प्रभाकरजी चव्हाण, नामदार भाईंचे स्वीय सहाय्यक अशोक कलाल,पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, सभापती सौ. धनश्री योगेश बोरसे, जिल्हा आत्मनिर्भर भारत संघटनेचे अध्यक्ष श्री राहुल रंधे, तहसीलदार आबा महाजन ,कृषी विकास अधिकारी उज्वलसिंग गिरासे, तालुका कृषी अधिकारी श्री अनिल निकुंभ, नरेंद्रसिंग जमादार माजी कृषी सभापती जिल्हा परिषद धुळे, कृषी विकास अधिकारी श्री पी एम सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री मालपुरे, गट विकास अधिकारी संजय सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील, शेतकरी नितीन ठाकरे व संदीप भामरे, कार्यसमन्वयक कृषी श्री दिनेश नांद्रे, तालुका व जिल्हा स्तरावरील कृषी व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी रुंद आणि कार्यक्रमाचे आयोजक श्री शिवाजी राजपूत, निलेश राजपूत व भोरखेडा गावाचे उपसरपंच प्रशांत राजपूत यांच्यासह पत्रकार बांधव, पंचक्रोशीतील सरपंच विविध राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते शेतकरी व भोरखेडा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची प्रस्तावना कृषी विकास अधिकारी  उज्वल  गीरासे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभे यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने