मलकापूर - उमेश ईटणारे
जळगाव : नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरधाव बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली . याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . रोशन मनोहर कोंगळे ( वय २० ) रा . झोडगा ता . मलकापूर जि . बुलढाणा असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे .याबाबत अधिक माहिती अशी की , रोशन मनोहर कोंगळे ( वय -२० ) रा . झोडगा ता . मलकापूर जि . बुलढाणा हा तरूण एकटा बुधवारी ६ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीने भुसावळ कडून जळगावकडे येत असतांना नशिराबाद रेल्वे उड्डाण पुलावर समोरून येणारी जळगावकडून मेहकरकडे भुसावळ मार्गे जाणारी भरधाव बस ( एमएच ४० एक्यू ६२७० ) ने जोरदार धडक दिली . यात अपघातात रोशन कोंगळे हा तरूण जागीच ठार झाला होता . अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली . घटनेचा पंचनामा करून मृतदेह रूग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला . याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
