महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून एसपीडीएम महाविद्यालयास ग्रंथदान



शिरपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर  यांच्या वतीने किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपी डीएम वरिष्ठ व डॉ . पां . रा . घोगरे कनिष्ठ महाविद्यालयास ग्रंथदान करण्यात आले . महाविद्यालयाच्या वतीने विश्वस्त व नगरसेवक मा श्री रोहित रंधे यांनी या ग्रंथांचा स्वीकार करतांना समाधान व्यक्त केले . ज्ञानाची परंपरा जोपासल्यामुळे मनसे च्या कार्यकर्त्यांचा इतरांनीही आदर्श घेण्याचे आवाहन केले .महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष व धुळे जिल्हा पक्ष निरीक्षक विनयजी भोईटे साहेब यांनी शिरपूर मनसे कार्यकर्त्यांकरवी हा ग्रंथसाठा   गरजू विद्यार्थ्यांसाठी पाठवला .यावेळी  मनसे धुळे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, मनसे तालुकाध्यक्ष पूनमचंद मोरे, मनसे शहराध्यक्ष चेतन राजपूत, मनविसे मा.धुळे जिल्हा उपाध्यक्ष सोनू राजपूत, मनसे महिला सेना तालुकाध्यक्ष लताताई माळी, मनसे तालुका उपाध्यक्ष अजय सोनवणे, ता. सहसचिव अमोल गुजर, वाघाडी गटाध्यक्ष विकी मोरे, विठ्ठल भिल, मनविसे ता. सहसचिव मयूर कोळी, विनोद कोळी, ईश्वर कुंभार, आकाश भिल, रोहित फुलपगारे, व अदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एम पाटील उपप्राचार्य डॉ फुला बागूल उपप्राचार्य प्रा . पी जी पारधी उपप्राचार्य प्रा . एस टी ठाकरे ग्रंथपाल डॉ . मंजुषा अहिरराव उपस्थित होते .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने