धुळे - दोंडाईचा येथील दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघ दोंडाईचा या संस्थेची 'वार्षिक सर्व साधारण सभा ताईसाहेब जमादार जेष्ठ नागरिक संस्थेचे सभागृह (हॉल), सानेगुरुजी कॉलनी दोंडाईचा येथे संस्थेचे अध्यक्ष
श्रीमान प्राचार्य डॉ. एस. पी. गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
याप्रसंगी सदरच्या सभेत संस्थेचे वार्षीक हिशोबपत्र व ऑडीट रिपोर्ट कोषाध्यक्ष सुरेश निंबाजी चौधरी यांनी सादर केले. तसेच संस्थेच्या कामकाजाचा वार्षीक अहवाल आणि संस्थाच्या भावी योजनांची व उपक्रमांचे सविस्तर विवेचन केले. यावेळी खालील कामकाजा करिता वार्षीक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सदरच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत पुढील विषयांवर कामकाज झाले. (१) मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. (२) सन २०२१-२२ च्या जमाखर्च वाचून मंजूर करणे. (३) सन २०२१ २२ च्या हिशोब पत्रकांच्या ऑडिट रिपोर्ट वाचून मंजूर करणे. (४) सन २०२२-२३ च्या अंदाज पत्रकास मंजूरी देणे. (५) सन २०२१-२२ च्या वार्षिक अहवाल वाचून मंजूर करणे. ( ६ ) तसेच अध्यक्षांच्या पुर्व परवानगीने आयत्या वेळी येणा-या विषयांवर वैचारीक चर्चा आदी विषयांवर वार्षीक सर्वसाधारण सभेत कामकाज झाले. सभा संपल्यानंतर उपस्थित सभासदांसाठी अल्पोहाराची व्यवस्था आयोजकांनी केली होती.
Tags
news
