शिरपूर तालुक्यातील लौकी गावात 66 वर्षे वृद्ध महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील लौकी गावातील रहिवासी कमलाबाई मच्छिद्र भिल ६६ या वृध्द महिलेने दि. २२ रोजी रात्री ८. ४५ वाजेपूर्वी राहते घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला पती मच्छिद्र भिल यांनी खाली उतरून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत पाटील यांनी तपासून वृध्देला मृत घोषित केले. याप्रकरणी शिरपूरशहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
.jpg)