शिरपूर तालुक्यातील भोईटी शिवारातील शेतात काम करीत असतांना अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यातील भोईटी शिवारातील तरुण शेतकरी काल (दि. २३) दुपारी ४ वाजेच्या सुमारास भंगी भुरला पावरा (३०) हे आपल्या शेतात काम करीत होते. यावेळी अचानक अंगावर वीज कोसळ्याने ते बेशुद्ध पडले. त्यांचा भाऊ दिलीप भुरला पावरा याने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉ. पाटील यांनी तपासून मयत घोषित केले. याबाबत वार्डबाय बी. डी. बोरसे यांनी दिलेल्या खबरीवरुन शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
