वाठोडा शिवारात इलेक्ट्रिक शॉक लागल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू





तालुक्यातील वाठोडा शिवारात इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या 63 वर्षीय शेतकऱ्यास इलेक्ट्रिक शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 23 जून रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भगवान हिरामण भोई वय 63 रा. वाठोडा हमू अरिहंत नगर मांडळ शिवार शिरपूर असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

तालुक्यातील वाठोडा येथे भगवान हिरामण भोई यांची वडिलोपार्जित बागायती शेतजमीन असून शेतात कापूस पिकाची लागवड झाल्याने व अद्याप पाऊस पडला नसल्याने त्यांनी पिकास पाणी देण्यासाठी ते 22 जून रोजी शेतात गेले असता त्यांनी इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्यासाठी हात लावला असता त्यांना जोरदार इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेतली.


तसेच वाठोडा येथील पोलीस पाटील जितेंद्र गिरासे यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात व वीज वितरण कार्यालयात

माहिती दिली. मयतास नातेवाईकांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. पवार यांनी तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी वार्डबॉय बीडी बोरसे यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली पुढील तपास पोना ललित खळगे करीत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने