धुळे शिवसेनेला खिंडार सतीश महाले यांनी शिवसेनेच्या राजीनामा

 



धुळे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्ता नाटक यामुळे राज्यभरात त्याचे पडसाद उमटत असून होणाऱ्या सर्व घडामोडींकडे कार्यकर्त्यांसह जनतेचे लक्ष लागून आहे.


धुळे जिल्ह्यात देखील आता आमदारांच्या बंडखोरीचे व समर्थनाचे प्रकार सुरू झाले असून नगर शिवसेना प्रमुख सतीश महाले यांनी आपल्या  पदाचा राजीनामा दिला आहे.


याबाबत त्यांचे असे म्हणणे आहे की मला वेळोवेळी अडचणीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी खूप मदत केली आहे आणि त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी शिवसेना महानगरप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे .


दोन दिवसांपूर्वी त्यांनी शहरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचे बॅनर लावले होते मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी ते बॅनर उतरवले होते त्यावरुन देखील वाद निर्माण झाला होता. शिवाय शिवसेनेतर्फे शहरात पक्षप्रमुख कथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलन रॅलीत देखील सतिष महाले सहभागी झाले नव्हते या सर्व घडामोडींत बद्दल शिवसैनिकांनी त्यांच्या निषेध व्यक्त केला आहे.


धुळे जिल्ह्यातून शिवसेनेचा राजीनामा देणारे ते पहिले पदाधिकारी असून त्यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने