केंद्रातील मोदी सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेली ‘अग्निपथ’ ही योजना सैन्यात कंत्राटी पद्धत लागू करणारी आहे. केवळ चार वर्षांची सेवा करून तरुणांना परत बेरोजगारीत ढकलण्याचा हा डाव आहे. लष्करी सेवेत भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धाडसी तरुणांच्या भवितव्याशी भाजपा सरकारने खेळ मांडला आहे. काँग्रेस पक्षाचा ‘अग्निपथ’ योजनेला विरोध असून तरुणांच्या व देशाच्या हितासाठी आज या योजनेविरोधात तीव्र आंदोलन केले , या पार्श्वभूमीवर शिंदखेडा विधानसभेतील दोंडाईचा येथे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने आणलेली ‘अग्निपथ’ योजना ही चार वर्षांची सेवा करून तरुणांना पुन्हा वाऱ्यावर सोडून देणारी आहे. चार वर्ष लष्करी सेवेत कर्तव्य बजावलेल्या जवानांना ऐन उमेदीच्या काळात उघड्यावर सोडून देणे हा त्यांचा अपमान करणारे आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर या अग्निविरांना भाजपा कार्यालयात चौकीदाराची नोकरी देऊ असे विधान भाजपाचे नेते करत आहेत यातूनच भाजपाचे जवानांबद्दलचे बेगडी प्रेम दिसून देते. देशसेवा करणाऱ्या जवानांचा अपमान आम्ही कदापी खपवुन घेणार नाही. सैन्यदलात केवळ चार वर्षांची सेवा म्हणजे देशाच्या सुरक्षेशी केलेली तडजोड असून हा देशद्रोहच आहे. तरुणांच्या भवितव्याशी केंद्र सरकारने खेळ चालवलेला असून याबद्दल भाजपा सरकारने देशाची माफी मागावी. अग्निपथच्या नावाखाली कंत्राटी लष्कर भरती करण्याला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी आमची मागणी करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून गेला .
यावेळी मा. राज्यमंत्री डॉ हेमतरावजी देशमुख, मा.नगराध्यक्ष रविंद्र देशमुख, नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी, संचालक प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे,बापु महाजन, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल दादा माणिक ,प.स.सदस्य विशाल देसले, दोंडाईचा शहराध्यक्ष वसंत कोळी, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू झालसे,आबा मुंडे, मा.उपसभापती शामकांत पाटील,लोहगाव सरपंच महेंद्र पाटील,राजु देशमुख,माधव पाटील, कैलास आखाडे, किशोर बागुल, चंद्रकांत शिरसाठ, हुसैन बोहरी, मुन्ना खाटीक, कल्लु पठाण, बापु निकम, नितीन देसले, महेंद्र देसले,खडु देसले, प्रशांत पदमोर, प्रशांत पाटील,वकिल ठाकरे,भागवत परदेशी,रतिलाल पाटील, रामकृष्ण धनगर, किशोर पाटील, भैय्या माळी, कुलदीप निकम,पवन पाटील, मोना शेहजाब्दिन पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
