दोंडाईचात पालिका प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना. दोंडाईचा ( अख्तर शाह.)



दोंडाईचा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची पुनर्स्थापना आज सकाळी १०-००  वाजता करण्यात आली.
      माजीमंत्री डॉ हेमंतराव देशमुख, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या उपस्थितीत दोंडाईचा अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे पालिका मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम यांनी केले.उपमुख्याधिकारी हर्षल भामरे यांनी यांनी श्रीफळ वाढवला तत्पूर्वी अभियंता शिवनंदन राजपूत यांनी पुतळ्यास जलाभिषेक करत पूजा केली.
      माजी मंत्री डॉ हेमंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष दयाराम कुवर, अमित पाटील शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भुषण कोळी यांनी माल्यार्पण केले.
 माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे,  शैलेश सोनार, राका सिंधी,भाजपचे शहराध्यक्ष प्रविण महाजन, करनी सेनेचे महामंत्री राजू देशमुख, माजी बांधकाम सभापती छोटू मराठे, राकेश पाटील,भुपेंद्र धनगर, दिलीप पाटील,असलम शाह, नरेंद्र कोळी, रमेश बोरसे, निखिल जाधव, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाजीम शेख अँड रवींद्र मोरे, जितेंद्र चव्हाण,अँड प्रमोद मराठे, कय्युम पठाण, घनश्याम राजपूत, बिलाल बागवान, रवींद्र पाटील, पिंटू महाजन, शिवा खंडाळे ,पिंटू खंडाळे,आबीद शेख, जितेंद्र तिरमले, योगेश तिरमले, गणेश चकणे, राकेश अग्रवाल, वसंत कोळी, हुसेन बोहरी, मनोजकुमार देशमुख, बळीराम पाटील ,जीवन भोई, प्रताप सिसोदिया, राजपाल चौधरी, माजी समाजवादी पक्षाचे उस्मान अशरफी, युवा सेना शहर प्रमुख सागर पवार,सागर पाटील, दिपक चौधरी, अमोल भट, बापू कोळी पालिकेचे अभियंता जगदीश पाटील आरोग्य निरीक्षक शरद महाजन, शिवाजी मराठे, कांतीलाल मोहिते, तलाठी संजय गोसावी पालिकेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते
सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संतोष लोले, उपनिरीक्षक सचिन गायकवाड शरद लेंडे पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने