धुळे प्रतिनिधी- धुळे जिल्ह्यात अवैध सावकारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोपावला असून त्यातीलच एक अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या राजेंद्र बंब यांच्यावर विविध गुन्हे अंतर्गत गुन्हा दाखल असून आर्थिक गुन्हे शाखेकडून याबाबत अधिक तपास केला जात आहे. या तपासातून नवनवीन खुलासे सादर होत असून आतापर्यंत करोडोंची काळी कमाई समोर आली आहे.
वादग्रस्त अवैध सावकार राजेंद्र बंब व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे 2010 पासून तब्बल 125 मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती येथील दुय्यम निबंधक कार्यालयाने पोलिसांना दिली आहे. या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे.
सदर दाखल गुन्ह्यांच्या बाबतीत समांतर तपास करत असताना पोलिसांना आत्तापर्यंत १२ कोटीहून अधिक रकमेची रोकड व १२ कोटीहून अधिक रकमेचे दागदागिने सापडले आहे तसेच शेकडो चौदा पावत्या, खरेदीखते गहाण खते ,ठेव पावत्या सापडल्या आहेत. असे असताना पोलिसांनी इन्कम टॅक्स एलआयसी दुय्यम निबंधक काम करून विविध प्रकारची माहिती तपासासाठी मागवली त्याचप्रमाणे दुय्यम निबंधक व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे 2010 पासून ठिकाणी 125 मालमत्तांची खरेदी झाल्याची माहिती दिली.
तसेच एलआयसी कडून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र बंब यांनी त्यांची पत्नी सोन अल्बम यांनी पाच हजार 229 विमा पॉलिसी काढले असून त्यापोटी त्यांना ५ कोटी 40 लाख 53 हजार ७२० रुपयांचे कमिशन देखील मिळाले आहे. यात कर्जदारांवर दबाव टाकून विमा पॉलिसी काढायला लावणे पहिले दोन हप्ते कर्जे देताना काढून घेणे मध्येच कॉलेज बंद केली तर सरेंडर फॉर्म त्या माध्यमातूनही पैसे मिळवणे अशा दाखल तक्रारी याबाबत प्राप्त झाल्या होत्या.
मात्र पोलीस तपासा दरम्यान आरोपींनी जर त्यांच्या कमाई विषयी अधिक माहिती दिली नाही तर मात्र आढळून आलेली मालमत्ता दाग दागिने जप्त करून सरकार जमा केले जातील असे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी म्हटले आहे.
