उपमुख्यमंत्री अजित पवार करोना पॉझिटिव्ह

 




मुंबई 

एकीकडे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे तर दुसरीकडे एकापाठोपाठ एक राजकीय नेत्यांना करोनाची लागण होत आहे...काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांना करोनाची लागण  झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना करोनाची लागण  झाली.

यापाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित पवार ( यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. 


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने