तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियानात सहभागाचे आवाहन




धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : गृहनिर्माण संस्थांमधील सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त गृहनिर्माण संस्था

अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात धुळे तालुक्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी सहभागी

व्हावे, असे आवाहन सहकारी संस्थांचे धुळे तालुका उपनिबंधक मनोज चौधरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय

पत्रकान्वये केले आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्थेतील कामकाजाबाबत तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे आणि संस्थेचे कामकाज

सहकारी संस्था अधिनियम, नियम व उपविधीतील तरतुदीप्रमाणे पार पाडल्यास सहकारी गृहनिर्माण संस्थांचे

व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होण्याच्या दृष्टिने गृहनिर्माण संस्थांमधील सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त अभियान

दरवर्षी 1 मे ते 30 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येते.

या अभियानांतर्गत नाव नोंदणी केलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजाबाबत 200 पेक्षा जास्त सभासद

असणाऱ्या संस्थाकरीता पहिला, दुसरा व तिसऱ्या क्रमांकासाठी उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या संस्थांची निवड

मूल्यमापन समितीमार्फत करण्यात येईल. उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहनात्मक प्रशस्तिपत्र व

मानचिन्ह देण्यात येईल. या अभियानात सहभागी होण्यासाठी इच्छुक गृहनिर्माण संस्था व त्यांच्या सभासदांनी

उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे तालुका या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका उपनिबंधक श्री.

चौधरी यांनी केले आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने