शिरपूर शहरातील प्रतिष्ठित व नामांकित व्यक्तिमत्त्व स्वर्गीय सरदारसिंग व स्वर्गीय रावसाहेब रामसिंग पाटील यांची पणती तसेच प्रा. ओ. एस. जाधव यांची नात (मुलीची मुलगी) कु. श्रुती सचिनसिंह ठाकोर ही मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये दहावीच्या परीक्षेत 99.80 टक्के गुण मिळवून मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम आली. मुक्ताईनगर येथील मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयातील शिक्षक सचिनसिंह ठाकोर यांचीती सुकन्या आहे.
याबद्दल शिरपूर येथील प्रा. ओ. एस. जाधव, संपूर्ण जाधव परिवार, मुक्ताईनगर येथील ठाकोर परिवार यांनी तसेच शिरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन गिरासे, प्रेमसिंग राजपूत, जितेंद्र जाधव, नारायण जाधव, माजी नगरसेवक हर्षल राजपूत, राजेंद्र गिरासे, समाजबांधव, नातेवाईक यांनी तिचा सत्कार केला.
