शिरपूर : खंबाळे येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात धुळे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी शिरपूरचे गटविकास अधिकारी सोनवणे सुद्धा उपस्थित होते. सुरुवातीला सीईओ भुवनेश्वरी एस. यांचा प्राचार्य आर.एन. पवार यांनी तसेच विद्यालयातील विद्यार्थिनींनी आदिवासी पेहराव परिधान करून सत्कार केला. प्रियदर्शिनी सहकीर सूतगिरणीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व कु. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून साकारलेली परस बाग पाहून आनंद व्यक्त केला. परस बाग ही उत्तम संकल्पना असल्याचे सांगून विद्यालयातील विद्यार्थिनींसोबत सुसंवाद साधला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व जि. प. माजी उपाध्यक्ष के. डी. पाटील, खंबाळे येथील सरपंच सुभाष पावरा, सुकलाल कोळी, दत्तात्रय कोळी, ग्रामसेवक आनंदा पाटील, आर. आर. माळी, सुनील जैन, योगेश्वर माळी, धीरज माळी, एस. डी. पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.
