भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव धुळे जिल्ह्यात राबविणार ‘हर घर झेंडा’ उपक्रम जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची माहिती

 



धुळे, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धुळे जिल्ह्यात 11

ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची प्रभावी

अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली

आहे.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात भारतीय स्वातंत्र्य

लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमाणसात रुजावी म्हणून हा

उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक

सूचनांनुसार राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्याबाबत विविध

सूचना दिल्या आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी देशाभिमान व जाणीव जागृतीची मोहीम

प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येक

शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतीवर राष्ट्रध्वज उभारणीसाठी

नागरिकांना प्रोत्साहित करावे.

राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेले सूत, पॉलिस्टर,

लोकर, सिल्क, खादीपासून तयार केलेल्या कापडाचा असावा. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस यंत्रणा, शाळा,

महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्र, स्वस्त भाव धान्य दुकान, सहकारी संस्थांनी देखील हा उपक्रम राबवावा,

असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने