पत्रकार रणवीर राजपूत, ठाणे
*हल्लेखोरांवर पोलिसांकडे कारवाईची मागणी*
पुणे,दि.२६ :- पुणे येथील *वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष* च्या कार्यालयाची तोडफोड अन् ना.एकनाथ शिंदेसाहेब अन् खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या फोटोंवर काळे फासणं,ही कृती अतिशय निंदनीय असून,त्याचा आपण जाहीर निषेध करतो,अशी संतापजनक प्रतिक्रिया पुणे मदत कक्षाचे समन्वयक श्री.राजाभाऊ भिल्लारे यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
सदर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हे ना.एकनाथजी शिंदेसाहेब यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलं आहे,याचं संबंधित हल्लेखोरांनी भान ठेवणं गरजेचं होतं.ही अत्यंत दुर्दैवी व घृणास्पद घटना असल्याचे येथील नागरिकांनी म्हटले आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हे गेल्या तीन वर्षांपासून गोरगरीब,निर्धन लोकांच्या आरोग्याची काळजी घेत,त्यांना मोफत औषधे,अन्य वैद्यकीय सेवा,महागड्या शस्त्रक्रिया करून देत आहे.
जातपात,पंत,धर्म,पक्ष बाजूला सारून गावोगावी जात आरोग्य शिबिरे आयोजित करून हे मदत कक्ष तनमनधनाने रुग्णसेवा
करत आहे,याला राज्यातील सर्वधर्मीय लोक साक्षीदार आहेत.अशा या पवित्र कार्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या मदत कक्षाच्या कार्यालयावर भ्याड हल्ला करणं,हे अशोभनीय असं दुष्कृत्य असून,त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे,अशी खंत श्री.भिल्लारे याप्रसंगी व्यक्त केली.
पुण्याच्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी ह्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी मदत कक्षाचे राज्य प्रमुख श्री.मंगेश चिवटेसर अन् श्री.भिल्लारे यांनी केली आहे.
