शिरपूर - विखरण बु. तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे लोकवर्गणीतून छत्रपती शाहू जी महाराज यांच्या जन्म जयंती उत्सव फार मोठ्या थाटामाटात पार पडला आयोजक कैलासवासी भाईदास आप्पा सेवाभावी संस्था अध्यक्ष दिलीप भाईदास पाटील यांनी केले होते लोकराजा छत्रपती शाहू जी महाराज यांची जयंती साजरी करताना विखरण गावातील सर्व sc लोकांशी चर्चा केली प्रत्येक घराघरात शंभर रुपये वर्गणी असं ठरलं त्यावेळेला एसीच्या लोकांनी एका क्षणाचा विलंब न करता पटापट पैसे देऊन गेले उर्वरित रक्कम दहा मित्रांकडून गोळा केली हा झाला
जयंती साजरा करण्याचा प्रकार सर्वप्रथम विखरण गावाचे प्रवेशद्वार राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कैलास वासी भाईदास आप्पा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली जर आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जन्म जयंती साजरी करताना सजीव देखावा जर ठेवलात तर अति उत्तम ठरेल असं आम्हाला वाटलं
मग एक भन्नाट आयडिया काढली 1 छत्रपती शिवाजी महाराज 2 क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले 3 राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा परिधान करून चार विद्यार्थी तयार केले आणि घोडा वर बसून संपूर्ण गावात खेळीमेळीच्या वातावरणात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकी साठी आमच्या गावातील घोडे वाले कैलास खंडू पाटील यांचे मोठे योगदान आम्हाला लाभलं विखरण गावातील माझ्या परिवारातील सदस्य आणि एस सी परिवारातील सर्व मुलींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला जशी ही मिरवणुकीमध्ये मुलींची इंट्री होत आहे असा आमच्या लक्षात आल्यावर आम्ही संस्थेच्या वतीने या सर्व मुलींना भगवे फेटे परिधान करून ढोल टिमकी च्या तालावर देशभक्ती गीत लावून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली नाचण्याच्या कार्यक्रम गावात कुठे घेतला नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला पण आम्ही जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ठरल्याप्रमाणे कार्यक्रम चालू होता यावेळेला मुलींनी संपूर्ण एसी परिवारांनी गाणे लावून मोठ्या उत्साहात नाचून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी केली आज आम्हाला अभिमान आहे जेव्हापासून विखरण गावाचं अस्तीत्व आहे तेव्हापासून आजतागायत राजश्री छत्रपती शाहू जी महाराज यांची जन्म जयंती ना कोणी साजरी केलेली आहे असे आमचे लक्षात आलं आजचा दिवस आम्हा आंबेडकरी वाघांसाठी मोठा आनंदाचा व उत्सवाचा दिवस आहे असे आमचे निदर्शनात आले जर संपूर्ण भारतातील ओबीसींच्या लोकांनी एसी च्या लोकांना सोबत घेऊन असाच विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी फार मोठी ही काळाची गरज आहे मला आजच्या अनुभवावरून असे दिसले संपूर्ण विखरण चौघा महापुरुषांचा सजीव देखावा आणि प्रथमता छत्रपती शाहू जी महाराज यांच्या जन्म जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाची घराघरात चर्चा होत आहे कार्यक्रम संपल्यानंतर गावात एसी च्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आम्ही पुढे नेत आहोत म्हणून गावातील सर्व ये समाज बांधव फार मोठी आनंदात दिसत आहेत
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मायाबाई पवार , मंगलबाई नगराळे , रेखाबाई दिलिप कढरे , यशोदाबाई पवार , देवकाबाई पवार , कमलबाई जगदेव , सविताबाई पवार , किरण पवार , दिलिप भाईदास पाटील , मिलिदं दिलिप कढरे.....इ. उपस्थित होते
Tags
news
