पुणे: इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मध्ये निवड. यामध्ये मॅककॅलटे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ५, बीईपी मशिनरी कंपनी, पुणे मध्ये २, महिंद्रा सस्टेन प्रा.लि.पुणे-१, इन्फोसिस मध्ये १, क्यू स्पायडर मध्ये ७
पेंटॅगॉन स्पेस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ४ , एक्झिकॉम टेली-सिस्टम मध्ये १ , ए. क्यू इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल कॉम्पोनन्ट्स मध्ये १ असा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्राचार्य डॉ.एस.टी.शिरकांडे यांनी अभिनंदन करत म्हणाले की महाविद्यालयाचा नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध विषयांच्या ट्रेनिंग तसेच प्लेसमेंट मध्ये महाविद्यालय आघाडीवर आहे. यावर्षीही कॅम्पस प्लेसमेंट ची परंपरा जपत अंतिम वर्षांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचीही नामांकित कंपन्यात झालेली निवड अभिनंदनीय आहे. संस्थेचे टी. पी.ओ. प्रा. एस. पी. कांबळे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कॉलेजमध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, फोरेन लांग्वेज कोर्सेस, एप्टीट्यूड टेस्ट ,मॉक इंटरव्ह्यू असे विविध उपक्रम नेहमी राबविले जातात. या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , सचिव भाग्यश्री पाटील उपाध्यक्ष अंकिता पाटील-ठाकरे आणि विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एस पी कांबळे आणि संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात आली
