नवविवाहित नर्सची गळफास घेऊन आत्महत्या




शिरपुर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील एका नव्या नवविवाहित नर्सरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली असून या दुर्दैवी घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे

तालुक्यातील जोयदा येथे काही दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या 26 वर्षीय नवविवाहित नर्सने सायंकाळी उशिरा सासरी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनीषा तोताराम पावरा वय 26 रा.दोंडवाडे जोयदा ता.शिरपुर असे गळफास घेतलेल्या नवविवाहित व्यवसायाने नर्सचे नाव आहे.
शिरपुर तालुक्यातील न्यू बोराडी येथील माहेर असलेल्या व व्यावसायाने वैद्यकीय सेवेत असलेल्या मनीषा पावरा हिचे 22 मे 2022 रोजी दोंडवाडे जोयदा येथील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या तोताराम पावरा यांची लग्न झाले होते.ती काही दिवसांपूर्वीच सासरी येथे आली होती दरम्यान 16 जून 2022 रोजी दोंडवाडे जोयदा येथील राहत्या सायंकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले.निलेश देवसिंग पावरा रा.दोंडवाडे जोयदा यांनी साडे 8 वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात मयत स्थितीत दाखल केले. डॉ.शशिकांत पाटील यांनी तपासणी करून मयत घोषित केले.याप्रकरणी वार्डबॉय गणेश बेंडवाल यांनी तालुका पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोहेकॉ माळी हे करीत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने