शिरपूर(प्रतिनिधी) तालुक्यातील बोराडी गावात लघुदाबाच्या वीज वाहिणीवर अनधिकृत आकडे टाकून व मीटरमध्ये फेरफार करून 2 हजार 13 युनिट विजेची चोरी करताना आढळून आले. त्यांना मुदत देऊन ही मुदतीत वीज बिल आणि दंडात्मक रकमेचा भरणा केला नसल्याने मनोज साहेबराव पाटील,अमोल पवार,गोपाल सामद भरवाड़ सर्व रा बोराडी ता.शिरपूर यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बोराडी उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता इर्शाद जमीर शेख यांनी तक्रार दाखल केली आहे.
दाखल तक्रारीनुसार तालुक्यातील बोराडी येथे
वीज वितरण कंपनीच्या गस्ती पथकाने 29 जानेवारी 2022 वीजचोरी शोधमोहीम राबवीली असता गावातील लघुदाबाच्या विजवाहिनीवर आकडे व मीटर मध्ये फेरफार करून वीज चोरी करतांना आढळून आले त्यात मनोज साहेबराव पाटील यांनी 8 हजार 890 रुपये किमतीची 1 हजार 424 युनिट,अमोल पवार यांनी 8 हजार 810 रुपये किंमतीची 173 युनिट तर गोपाल सामद भरवाड़ यांनी 5 हजार 560 रुपये किमतीची 416 युनिट असे 2 हजार 13 युनिट वीजेची चोरी करतांना आढळून आले. त्यांना वीज बिलासह दंडात्मक रक्कम भरण्याची मुदत देत वीज बिल देण्यात आले होते मात्र मुदत देऊनही तिघा संशयितांनी महावितरण कंपनीचे 2 हजार13 युनिट वीजेची चोरी करून तडजोडीचे दंडाचे व वीज बिलाचे 32 हजार 360 रक्कमेचा भरणा केला नसल्याची तक्रार दाखल केली.दाखल तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
