प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांचे बैठकीत निर्देश




धुळे, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात अवैध प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिले आहेत.

• राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. आर. शेख, शिक्षणाधिकारी मोहन देसले (माध्यमिक), शशिकांत साळुंखे (प्राथमिक), अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन पाटील आदी उपस्थित होते.

श्री. गायकवाड यांनी सांगितले, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना प्रत्येक विभागाने सोपविलेली जबाबदारी पार पाडावी. सुटी सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. जागतिक तंबाखू नकार मोहिमेनिमित्त पोलिस विभागातील अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अधिकारी व कर्मचान्यांची मौखिक तपासणी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने