हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न



हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न 


प्रतिनिधी दत्ता पारेकर


पुणे:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत इंदापूर तालुक्यातील शैलेश देवराव मोरे, दिपाली शिवाजी धालपे, चेतन अनिल ढावरे, अशोक बाळासाहेब नरूटे यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


एका अतिशय प्रामाणिक व कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून आपण आपले व आपल्या तालुक्याची शान वाढवावी. आपल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेसाठी सर्वांना सोबत घेऊन आपण काम करावे, असे हर्षवर्धनजी पाटील सत्कार प्रसंगी म्हणाले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने