Victory वर नाही तर history वर फोकस करा* *राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात दिनेश ठाकरेंचे प्रतिपादन* दोडाईचा (अख्तर शाह)



दोंडाईचा- हिटलर चे एक प्रसिध्द वाक्य आहे, ज्याला सहज यश मिळते ती victory असते आणि ज्याला अथक परिश्रम घेऊन यशप्राप्ती होते ती history असते म्हणून आपला फोकस हा history वर ठेवा असे प्रतिपादन  दिनेश ठाकरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराप्रसंगी केले
 दादासाहेब रावल महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्ले ता शिंदखेडा येथे ७ दिवसीय शिबिराचे उद्घाटन उद्योजक सरकार साहेब रावल यांच्या हस्ते बुधवारी सकाळी पार पडले त्यात दुपारच्या सत्रात यशस्वी जीवनाचा मूलमंत्र या विषयावर दिनेश ठाकरे यांनी आपले विचार विद्यार्थ्यासमोर मांडले
 यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ के एस चौधरी, सहा कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ एन व्ही पाठक,  प्रा मयुरी गिरासे, प्रा हर्षाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते
 यावेळी बोलताना श्री दिनेश ठाकरे म्हणाले की, प्रत्येक वक्ता , विचारवंत आपल्याला नेहमीच सांगतात की, आपण अष्टपैलू व्हा, पण अष्टपैलू व्यक्तीच्या पदरी ही निराशाच येते म्हणून आपण जे क्षेत्र निवडले त्यात पूर्ण स्वतः ला झोकून द्या आपण नक्कीच यशस्वी व्हाल, आपण मराठीचा पेपर देत असतांना आपल्याला भविष्य काळ चा भुतकाळ करायला सांगितले जाते पण वास्तविक जीवन जगत असताना आपल्याला काळ बदलला येत नाही, हे केवळ परिक्षे पुरतेच असते, यासाठी आपण आपला वर्तमान बदलला तर आपले भविष्य देखील उज्वल असते म्हणून आपण कोणते शिक्षण घेत आहोत, कोणत्या क्षेत्रात आपल्याला करियर करायचे आहे यावर आपला भर असला पाहिजे, पुढे श्री ठाकरे यांनी त्यांच्या जीवनात आलेले अनेक अनुभव सांगत म्हणाले की, पत्रकारिता क्षेत्र ज्यावेळी निवडले तो काळ  २००१ चा होता तेव्हा हाताने बातमी लिहून पाठवीत होतो पण या २०  वर्षात जग बदलले तसे स्वतःला बदलले म्हणून या क्षेत्रात आजही मी टिकून आहे, यासाठी काळाबरोबर आपण देखील बदलले पाहिजे असे सांगत त्यांनी श्रीमंती ची व्याख्या आता बदलली असल्याचे सांगत पूर्वी ज्याच्याकडे पैसा, जमीन जास्त तो श्रीमंत मानला जात असे पण आता ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो श्रीमंत मानला जातो म्हणून आपला फोकस हा ज्ञानावर ठेवा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असे श्री दिनेश ठाकरे यांनी नमूद केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने