कर्ज माफीसाठी शेतकरी आजीबाई बसल्या उपोषणास




शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर तालुक्यातील उंटावद येथील 70 वर्ष वयाच्या महिला शेतकरी आपणास कर्जमाफी मिळावी म्हणून सहाय्यक उपनिबंधक कार्यालय शिरपूर समोर आमरण उपोषणास दिनांक 02 मार्च पासून बसले आहेत. तालुक्यातील वयोवृद्ध शेतकरी महिला आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असल्याने त्यांना अनेक सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना पात्र असून देखील माझी दिशाभूल करण्यात आली व माझ्या कर्जमाफीचा लाभ वगळण्यात येऊन माझ्या खात्यातून शेती उत्पन्नातून येणाऱ्या जमा रक्कम बँकेने कोणतीही पूर्वसूचना न देता पैसे  कपात करून घेतले या कारणास्तव बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिरपूर यांच्या मनमानी कारभाराचा विरोधात व आपणास शासनाची कर्जमाफी मिळावी आणि या प्रकरणाशी संबंधित दोषींवर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी या आजीबाई आमरण उपोषणास बसले आहेत.
शांताबाई धुडकू महाजन रा. उंटावद तालुका शिरपूर असे या वृद्ध शेतकरी महिलेचे नाव असून त्यांची सावळदे शिवारात 4 एकर शेती आहे त्यांचे खाते शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे. त्यांनी बँकेकडून 2014मध्ये 1 लाख 48 हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते मात्र नापिकीमुळे ती कर्जफेड होऊ शकली नाही. दरम्यान शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली त्यात पात्र लाभार्थ्यांच्या यादीत बँकेने शांताबाईचे हे नाव जाहीर केले त्यांनी कर्जमाफीच्या अर्ज देखील केला मात्र तांत्रिक दोषांमुळे त्यांची बँक शाखा शिरपूर ऐवजी अर्थ दाखवण्यात आले त्यामुळे या आजीबाई कर्ज माफी अपात्र ठरल्या तरी बँकेने त्यांना अपात्र असल्याची कल्पना न देता पुढील यादीत नाव येईल असे सांगून अंधारात ठेवले दरम्यान या महिला शेतकऱ्याला असे वाटले की आपण कर्जमाफी पात्र असल्याने शासनाने आपले कर्ज माफ केले आहे .मात्र त्यांच्या खात्यातून बँकेने जमा झालेल्या शेती उत्पन्नाच्या रकमेतून अनुक्रमे 1 लाख व त्यानंतर 28 हजार रुपयांच्या रकमा कपात करून घेतले आणि आपण कर्जमाफी अपात्र आहात म्हणून कर्जाची रक्कम वसूल केली असे त्यांना सांगण्यात आले.
मात्र याबाबत शांताबाई यांचे असे म्हणणे आहे की मी कर्जमाफी साठी अर्ज दिला होता कर्जमाफीच्या यादीत माझे नाव देखील होते मात्र तांत्रिक चुकांमुळे माझी माझ्या कर्जमाफीचा लाभ हिरावला गेला असून त्यास पूर्णपणे उपनिबंधक कार्यालय व  बँक प्रशासन जबाबदार आहे,. त्यामुळे त्यांनी याबाबत न्याय मिळवण्यासाठी उपनिबंधक कार्यालय यांना पत्रव्यवहार करून कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याबाबत विनंती केली होती व सदरच्या लाभ न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
 त्यानुसार त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे दरम्यान उपनिबंधक यांनी आपण पात्र लाभार्थ्यांच्या याद्या बँकेत पाठवले आहेत पुढील कार्यवाही बँकेने करावयाची होती असे सांगत जबाबदारीतून पळ काढला आहे ,तर बँक ऑफ महाराष्ट्रा च्या वतीने असा खुलासा देण्यात आला आहे की सदर महिलेने ऑनलाइन कर्ज माफी च्या अर्ज न केल्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही म्हणून बॅंकेने आपल्या कर्जाच्या रकमेची वसुली केली आहे.
मात्र सदर शेतकरी महिला या आपल्या कर्जमाफीवर ठाम असून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे याबाबत झालेल्या पहिल्या दिवसाचे चर्चा निष्फळ ठरले असून यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही त्यांच्या आंदोलनास धुळे जिल्हा जागृत मंच चे डॉ. सरोज पाटील, शेतकरी विकास फाउंडेशनचे मोहन पाटील ,एडवोकेट गोपालसिंग राजपूत, पत्रकार गोपाल मारवाडी इत्यादींनी पाठिंबा दिला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने