पिंपळनेर पोलीसांकडुन अवैद्यरित्या गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई ३९,४०,७०० रु. कि. गुटख्यासह पिकअप व ईनोव्हा कार जप्त




पिंपळनेर - धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना अवैद्य  गुटका वाहतूक करणारा वाहनावर कारवाई करण्यात यश आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार  पोलीस स्टेशन हद्दीतील आंतरराज्य तसेच आंतर जिल्हा सीमेवर वेळोवेळी पेट्रोलिंग तसेच नाकाबंदी व गोपनीय बातमीदारा कडुन गुप्त माहिती प्राप्त करण्यात येत होत्या.

काल दिनांक ०१ मार्च २०२२ रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतून नवापुर साक्री मार्ग अवैधरित्या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटख्याची वाहतुक होणार आहे अशी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी •अधिकारी सपोनि / सचिन साळुंखे यांना खात्रीशीर बातमी मिळाली होती, त्यानुसार सपोनि / सचिन साळुंखे, पोना/ विशाल मोहने, पोशि/मकरंद पाटील, चापोशि/ रविंद्र सुर्यवंशी अशानी सामोडे चौफुली येथे सापळा लाऊन थांबलेले असतांना रात्री ०९.०० वा. चे सुमारास बातमी प्रमाणे एक पिकअप वाहन येतांना दिसले त्यास थांबवून त्यावरील चालक यांस त्यांचे नाव गाव विचारता त्यांने त्यांचे नाव नासीर खॉन हयात खॉन, वय ४२ वर्ष, रा. मिल्लत नगर, ४० गांव रोड, धुळे असे सांगितले त्यास पिकअप मधील मालाबाबत विचारपुस केली. असता त्याने पिकअपमध्ये विमल नावाचा सुगंधीत पान मसाला असल्याचे सांगुन सदर माल हा धुळे येथील राहणार नाना विठ्ठल साबळे व अमोल मोरे यांचे सांगण्यावरुन मी, तसेच जुबर अन्सारी, वसीम अन्सारी, सोनु विधाते तीन्ही रा. नटराज टाकी जवळ, धुळे सचिन जिवन मुर्दाडकर, रा. ५ वी गल्ली, धुळे, प्रियकिर्ती राजु पगारे, रा. गायकवाड़ चौक, धुळे यांचे सोबत गुजरात राज्यातून विकत घेऊन धुळे येथे जात होतो तसेच माझ्या सोबत असलेले वरील इसम हे ईनोव्हा कार क्रमांक एम.एच. ०६ बी.ई. ७६९५ यामध्ये बसुन रस्त्यावर पोलीसांचे वाहनावर पाळत ठेवून त्यांनी सांगितले प्रमाणे वाहन मागे पुढे चालवित असतो असे सांगितले. तेव्हा चालककडे विचारपुस चालू असतांना ईनोव्हा कार क्रमांक एम.एच.-०६- बी.ई. ७६९५ हीस थांबण्याचा ईशारा दिला असता ती थांबली नाही तिचा पाठलाग करून तिला पकडली असता त्यामधील जुबेर अन्सारी, वसीम • अन्सारी, सोनु विधाते तीन्ही रा. नटराज टाकी जवळ, धुळे सचिन जिवन मुर्दाडकर, रा. ५ वी गल्ली, धुळे हे पळून गेले व प्रियांकती राजु पगारे रा. गायकवाड़ चौक, धुळे यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर कारवाई दरम्यान खालील प्रमाणे मुद्देमाल पकडुन जप्त करण्यात आलेला आहे.

१. ८,००,०००/-रु.
एक पिकअप वाहन तिचा आर.टी.ओ. क्रमांक एम. एच. ४६. बी. बी. ०१७३ 

 २  .१०,७४,०६०/-रु.
पिकअपच्या करीमध्ये २७ पांढ-या रंगाच्या गोण्याप्रत्येक गोणीमध्ये २०० पाकीटे, प्रत्येक पाकीट किंमत १८७ रुपये पाकीट
विमल पान मसाला बोलो जुबा केसरी असे नाव छापलेले असे एकुण ५,४००/- पाकीट तसेच प्रत्येक गोणीमध्ये ४० पाकीट प्रती ५९.५ रुपये किंमतीचे विमल पान मसाला बोलो जुबा केसरी असे नाव छापलेले असे एकूण १,०८० पाकोट

३ . ६,०२,१००/- रु.
 पिकअपच्या कॅरीमध्ये १५ पांढ-या रंगाच्या गोण्या , प्रत्येक गोणीमध्ये २०० पाकीटे, प्रत्येक पाकीट किंमत १९८ रुपये पाकीट | विमल पान मसाला बोलो जुबा केसरी असे नाव छापलेले असे एकुण ३,०००/- पाकीट तसेच प्रत्येक गोणीमध्ये १० पाकीट प्रती ५४ रुपये किंमतीचे | विमल पान मसाला बोलो जुबा कैंसरी असे नाव छापलेले असे एकुण १५० पाकीट

४. १.८९,५४०/- रु.
पिकअपच्या कॅरीमध्ये २७ पांढ-या रंगाच्या गोण्या | प्रत्येक गोणीमध्ये २०० पाकीट, पाकीटची किंमत ३३रु त्यावर व्हि. तंबाखुचे असे एकुण ५४०० पाकीटे त्यावर व्हि १ तंबाखु छापलेले सह प्रत्य गोणीत व्हि-१ तंबाखु ४ पाकीट असे एकुण १०८ पाकोट त्यांची किंमत रु प्रमाणे 

५ . ७५,०००/- रु.
 पिकअपच्या करीमध्ये १५ पांढ-या रंगाच्या गोण्या प्रत्येक गोणीमध्ये २०० पाकीट, प्रति पाकीटची किंमत २२ रु त्यावर व्हि. १ तंबा असे नाव छापलेले असे एकूण ३००० पाकोटे सह प्रत्येक गोणीमध्ये २०० पाकोटे, प्रत्येक पाकीट किंमत १९८ रुपये पाकोट विमल पान मसाला बोलो जुबा केसरी असे नाव छापलेले असे एकुण ३,०००/- पाकीट तसेच प्रत्येक गोणीमध्ये १० पाकीट प्रती ५४ रुपये किंमतीचे | विमल पान मसाला बोलो जुबा केसरी असे नाव छापलेले असे एकूण १५० पाकीट

६. १,८९,५४०/- रु.
 पिकअपच्या कॅरीमध्ये २७ पांढ-या रंगाच्या गोण्या | प्रत्येक गोणीमध्ये २०० पाकोट, पाकीटची किंमत ३३ रु त्यावर व्हि. १ तंबाखूचे असे एकुण ५४०० पाकोटे त्यावर व्हि- १ तंबाखु छापलेले सह प्रत्येक व्हि-१ ४ एकूण | गोणीत व्हि- १ तंबाखु ४ पाकीट असे एकुण १०८ पाकीट त्यांची किंमत १०५ रु प्रमाणे असे एकुण अ.क्र. १ मध्ये असलेल्या पिकअपच्या कॅरीमध्ये १५ पांढ-या रंगाच्या गोण्या | प्रत्येक गोणीमध्ये २०० पाकीट प्रति पाकीटची किंमत २२ रु त्यावर व्हि. १ तंबाखु असे नाव छापलेले असे एकुण ३००० पाकोटे सह प्रत्येक गोणीत व्हि- १ तंबाखु नावाचे १०० पाकीट ६ रु प्रमाणे असे एकुण १५०० पाकीट अशी जु.वा. कि.सु.

१२,००,०००/- रु. कि. एक ईनोव्हा कार क्रमांक तिचा आर.टी.ओ क्रमांक एम.एच.-०६- बी.ई. ७६९५

एकूण ३९,४०,७००/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकाराबाबत पिंपळनेर पोलीस स्टेशनला भाग ५ गुरनं ४७/२०२२, /मकरंद पाटील यांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोउनि/प्रदिप सोनवणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रविण पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव, मा. उप. विभा. पो. अधि. श्री. प्रदिप मैराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/श्री. सचिन साळुंखे, पोउनि/प्रदिप सोनवणे, पोउनि / भाईदास मालचे, असई / प्रविण अमृतकर, पोना/ विशाल मोहने, पोना / चेतन सोनवणे, पोशि / सोमनाथ पाटील, पोशि/ मकरंद पाटील, पोशि/रविंद्र सुर्यवंशी अशांनी केली आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने