अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार ; मलकापूर शहरात अवघ्या दोन दिवसांमध्ये दोन मोठे अपघात मलकापूर - उमेश ईटणारे




अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज 2 मार्च रोजी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास मलकापूर शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाघूड फाटा नजीक अंकुर सीड्स जवळ घडली.
     भरधाव वेगातील मलकापूर कडून खामगाव कडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने मलकापूर कडे येत असलेल्या  क्रमांक एमएच 28 एम 2622 वाहनाला जोरदार धडक दिल्याने या धडकेमध्ये सचिन रामा नाईक रा. (खडकी) जामनेर याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची पोलिसांना माहिती पडताच पोलीस  घटनास्थळी गाठून पंचनामा करून शरीर शवविच्छेदना करिता उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे पाठवले. अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन पसार झाले. घटनेचा पुढील तपास मलकापूर शहर पोलिस करीत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने