श्रीराम फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घातला कंपनीला गंडा... प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:इंदापूर शहरातील श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड या कंपनीच्या  कर्जदाराकडून वाहन कर्ज व इंधन कर्जाची रक्कम वेळोवेळी गोळा करून संगनमताने कट रचून कर्जदाराने विश्वासाने ताब्यात दिलेल्या पैशाचा अप्रमाणिक पणाने कर्जदाराची व कंपनीची आर्थिक फसवणूक करून स्वतःचा फायदा करत तब्बल १७,३२,५५० रुपयांवरती डल्ला मारल्याप्रकरणी श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्मचारी यांच्याविरुद्ध इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम ४२०,४०६,४०८,४०९,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर फसवणुकीची तक्रार सुनील तानाजी कारंडे ,रा. रूई, ता. बारामती, जि. पुणे यांनी दिली असून सदर घडलेल्या घटनेत १) आनंद अशोक उदावंत रा. खंडोबा नगर बारामती जि. पुणे, २) अमोल मोहन सावंत रा. कळंब वालचंदनगर ता. इंदापूर जि. पुणे,३) प्रमोद चव्हाण रा. आमराई ,बारामती जि. पुणे ४) सुरज चंद्रकात गायकवाड रा. आकोले बु टेभूर्णी ता. माढा जि सोलापुर ,५) श्रीशील चंद्रप्पा मद्याळ रा. इंदापूर, जि. पुणे ,६) अक्षय संजय बोराडे रा.शेटफळगढे ता इंदापुर जि. पुणे अशी आरोपींची नावे आहेत. 

सदर प्रकरणाचा तपास इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माने व महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने