शिरपूर : मुकेश पटेल सीबीएसई स्कूल मध्ये एस.व्ही.के.एम. मुंबई व ॲम्युचर फुटबॉल असोशिएशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मम्मीजी चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धांचे शानदार उद्घाटन झाले असून धुळे जिल्ह्यातील 46 संघ दाखल झाले आहेत.
एस.व्ही.के.एम. मुंबई व ॲम्युचर फुटबॉल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तांडे ता. शिरपूर येथील मुकेश आर. पटेल सीबीएसई निवासी स्कूलच्या मैदानावर दि. २ मार्च पासून ४ मार्च पर्यंत जिल्हास्तरीय दिवसरात्र फुटबॉल स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. सदर स्पर्धेसाठी एकूण ४६ संघांचा समावेश आहे.
मंगळवारी 2 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता स्कूलच्या मैदानावर हवेत फुगे सोडून व श्री गणेश मूर्ती, सरस्वती माता मूर्ती व स्व. मुकेशभाई पटेल प्रतिमा पूजनाने शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ॲम्युचर फुटबॉल असोशिएशन इंडिया मुख्य कार्यकारी अधिकारी बाबा बाविस्कर, एस. व्ही. के. एम. व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, संचालक बबनलाल अग्रवाल, ॲम्युचर फुटबॉल असोशिएशन इंडिया खजिनदार भालचंद्र सोनगत, महाराष्ट्र सचिव संदिप शिंदे, ॲम्युचर फुटबॉल असोशिएशन इंडिया सचिव मंगलताई मोरे, न्यू षटकार क्लब अध्यक्ष धर्मेंद्र मोहिते, ॲम्युचर फुटबॉल असोशिएशन इंडिया सचिव रजनीकांत पाटील, यशवंत बाविस्कर, विजय अग्रवाल, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्रितेश पटेल, सुभाष कुलकर्णी, फिरोज काझी, जाकिर शेख, संस्था अभियंता ईश्वर पाटील, संजय चौधरी, भालेराव माळी, प्राचार्य डॉ. पी. सुभाष, प्राचार्य दिनेशकुमार राणा, प्राचार्य निश्चल नायर, प्राचार्या रथी नायर, प्राचार्या भूमिका गर्ग, उपप्राचार्य अनिता थॉमस, श्रीकांत चव्हाण, मुकेश पाटील, जयेश बडगुजर, मोहसीन शेख, अयात खान, शफीक शेख, मोहित जैन, विकास पंजाबी, पदाधिकारी, क्रीडा शिक्षक, फुटबॉल संघ पदाधिकारी, खेळाडू उपस्थित होते.
प्रास्ताविकपर भाषणात प्राचार्य पी. सुभाष म्हणाले, धुळे जिल्ह्यातील 46 संघांचे 800 खेळाडू सहभागी झाले असून 19 वर्षे खालील, 17 वर्षे खालील, 14 वर्षे खालील संघांचा समावेश आहे. खेळाडू यांच्या क्रीडा विकासासाठी एस. व्ही. के. एम. अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिश भाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे खूपच प्रयत्न आहेत. मुकेश पटेल सीबीएसई निवासी स्कूल मध्ये 1.25 लाख स्क्वेअर फूटचे इनडोअर स्टेडियम चे काम जोमाने सुरु आहे.
.
मुकेश पटेल मिलिटरी स्कूलचे बँड पथक, सर्व फुटबॉल संघ, घोडेस्वार विद्यार्थी व शिक्षक यांनी मानवंदना व सलामी दिली. शाळेचे क्रीडा संचालक संतोष उदनिया, क्रीडा सहसंचालक अभय कचरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विशाल पाल, सुनील वाडेकर, कमलेश पांडे, पायल खालसा यांनी केले. आभार संतोष उदनिया यांनी मानले.