शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील एका युवकाचे अकस्मात निधन झाले असून सदरच्या युवक हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. मात्र त्याचे इंजिनीअरिंगचे स्वप्न पूर्ण राहिले असून त्याचे अकस्मात निधन झाले आहे.
शिरपूर तालुक्यातील कुरखडी येथील जयेश पावजी धनगर वय 18 असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या पश्चात आई वडील एक बहीण असा परिवार आहे. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. याबाबत वृत्त असे की जयेश हा कॉलेजला गेला असताना दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मित्रांसोबत जेवत असताना अचानक चक्कर येऊन पडला. त्यास प्राध्यापक नितीन बोरसे यांनी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचारासाठी धुळे येथे नेण्याच्या सल्ला दिला गेला मात्र उपचारादरम्यान ज्येष्ठ मृत्यू झाला . हा विद्यार्थी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगच्या दुसर्या वर्षात आर सी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. जयेश चे वडील पावजी धनगर हे आदर्श माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे मात्र अचानक आलेल्या या संकटाने धनगर परिवारावर फार मोठे संकट ओढवले असून जयेश च्या झालेल्या अचानक मृत्यूमुळे तालुका हळहळ व्यक्त होत आहे.
Tags
news
