शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलिसांना आपल्या तपास कामात मोठे यश आले असून चोरीच्या 12 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
शिरपूर शहर पोलीस अधिकाऱ्यांना 1 मार्च रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार पोलिसांनी एका अट्टल चोरट्यास दुचाकी चोरी चारपाच ताब्यात घेतले होते. त्याची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून 2 दिवसात 3 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 12 मोटर सायकल ताब्यात घेत 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत .
याबाबत अधिक वृत्त असे की शहरातील करवंद नाक्यावरील हुलेसिंग नगर मधील खाजगी वसतिगृहातून 14 जानेवारी 2022 रोजी रात्रीच्या सुमारास लाल रंगाची होंडा कंपनीची सी बी यूनिकॉर्न क्रमांक एम. एच. 18 - ए यु 28 70 अज्ञातांनी चोरून नेली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयित विकास चंपालाल बर्डे रा. अंजनगाव तालुका सेदवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश या शहर पोलिसांनी दुचाकीसह ताब्यात घेत अटक केली होती. दरम्यान न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत जिल्ह्यासह मध्य प्रदेश राज्यातून एकामागून एक विविध कंपनीच्या 3 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 12 मोटरसायकली ताब्यात घेतले आहेत .
सदरची कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव ,उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, संदीप मुरकुटे, तसेच शोध पथकाचे पोलिस कॉन्स्टेबल ललित पाटील, लादूराम चौधरी, गोविंद कोळी, विनोद अकडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा व आर सी पी पथकाचे पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत पवार इत्यादींचे पथकाने केली आहे.
Tags
news
