*एसटी बसेस अभावी विद्यार्थ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड* सुरळीत चालू असणाऱ्या मार्गांवरील बस पासेस मागणी.....




धुळे- विलगीकरणाच्या मुद्द्यावरून बऱ्याच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर उतरले आहेत,त्यांच्या या संपामुळे धुळे आगाराचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे,त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक प्रवाशांना आर्थिक भाड्याच्या भुर्दंड बसला आहे,ऐन लग्न सिजन चालू असतांना  रस्त्यांवर प्रवाशांची गर्दी दिसून येते,यामुळे खाजगी वाहनांमध्ये प्रवाशी रिस्क घेतात, त्यात दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा,महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे,परंतु दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचे भाडे परवडत नाही,दूर अंतरावर असणारे विद्यार्थी हे जास्तीचे भाडे असल्याने शाळा,महाविद्यालयात दररोज जाणे टाळत असतात,यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे,सद्या परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने ज्या मार्गांवरील एसटी बसेस सुरळीत चालू आहेत,त्या मार्गांवरील विद्यार्थ्यांना पासेस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शालेय विद्यार्थी करीत आहेत,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने