शिरपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण हेतुपुरस्सर घालवले असून ओबीसी समाजाला या आरक्षणाच्या माध्यमातून मिळणारी जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर सभापती यासारखी महत्वपूर्ण पदे यापुढे मिळणार नाहीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले असून महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाला मिळणारी ही महत्त्वपूर्ण पदे कायमस्वरूपी घालवली असल्याचे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रातुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान इम्पेरिकल डेटा न देता गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात रेटून नेला परिणामी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी देखील दिलेल्या सूचनेप्रमाणे माहिती राज्य सरकारने पुरवली नाही म्हणून राजकारणात असणारे ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने या वेळी स्थगित केले ही बाब संपूर्ण ओबीसी समाजाचा घात करणारी आहे, ओबीसी समाज महाविकास आघाडी सरकार यांना कदापि माफ करणार नाही अशी टीका भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. याविषयी मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत पुढचा निर्देश देत नाही, तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह या निवडणुका घेतल्या जाणार नाहीत असे स्पष्ट झाले आहे, राज्यातील ओबीसींचे राजकीय व्यासपीठ, संधी आणि भविष्य संपवण्याचा अधिकार कोणाला नाही. ओबीसी राजकीय आरक्षण नाही तर निवडणूक नाही असं त्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजासोबत बेईमानी केली आहे हे सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकांमधून ओबीसी समाजाचे नेतृत्व बाद करण्याचा महाविकास आघाडी सरकारचे कटकारस्थान असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केला आहे. राज्य सरकारने अर्धवट, अपुऱ्या अभ्यासावरून तयार केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण आता मिळणार नाही. राज्यातील ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळून देईपर्यंत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघर्ष करत राहील, आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे.
आरक्षण मिळून देईपर्यंत भाजपा महाराष्ट्र प्रदेश संघर्ष करत राहील, ओबीसी समाज महाविकास आघाडी सरकार यांना कदापि माफ करणार नाही - बबनराव चौधरी
byMahendra Rajput
-
0
