मुंबई - महागाईने याआधीच त्रस्त असलेल्या जनतेला आता पुन्हा खाद्यतेल व पेट्रोल डिझेलच्या दरात भरमसाठ दरवाढ होऊन सामान्यांचे बजेट कोलमडणार असून खिशाला कात्री लागणार आहे .असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या महिन्यात पेट्रोल डिझेलच्या दरात 12 ते 15 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात सुरू असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुका मुळे सध्या पेट्रोल व डिझेलचे दर हे स्थिर आहेत यात कोणतीही वाढ करण्यात येत नाही मात्र सदरच्या निवडणुका संपल्यानंतर दहा मार्च नंतर पेट्रोल डिझेलच्या दरात दरवाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. सध्या देशात 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत फार मोठी वाढ झाली आहे मात्र तरीदेखील सरकारच्या दबावात तेल कंपन्यांना दरात कोणताही बदल करता येत नाही मात्र वाढीव दराने पेट्रोल-डिझेलची खरेदी करावे लागत आहे त्यामुळे तेल कंपन्यांचे फार मोठे नुकसान होत आहे असा दावा केला जात आहे .सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बेलर 115 रुपये डॉलरचे टप्पा ओलांडला आहे मागील नऊ वर्षात पहिल्यांदाच 120 रुपये प्रति डॉलर्सच्या दर हा वाढला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या घडामोडी व होणारी दरवाढ व युद्धजन्य परिस्थिती याचे परिणाम आता भारतीयांना देखील भोगावे लागणार असून आगामी काळात पेट्रोल-डिझेलची दरवाढ निश्चित मानले जात असून 12 ते 15 रुपयांनी दरवाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Tags
news
