इंदापूरचे ग्रामदैवत इंद्रेश्वर मंदिरात राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला रुद्राभिषेक प्रतिनिधी दत्ता पारेकर




  पुणे:इंदापूर शहराचे प्रसिद्ध ग्रामदैवत इंद्रेश्वराची यात्रा सुरू असून आज राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सकाळी इंद्रेश्वर मंदिरात रुद्राभिषेक करून इंदापूर तालुक्यामध्ये सुख समृद्धी नांदो अशी प्रार्थना केली तसेच महाशिवरात्रीनिमित्त राज्यातील सर्व जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
     प्रसिद्ध ग्रामदैवत इंद्रेश्वर यात्रा उत्सव सुरू असून सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. काल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंद्रेश्वर यात्रेत सहभागी होऊन त्यांनी रथ ओढला.
   आज सकाळी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर इंद्रेश्वर मंदिरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते रुद्राभिषेकाचा विधी संपन्न झाला.
   यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा, इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप वाशिंबेकर, ललेंद्र शिंदे, रघुनाथ राऊत , संतोष देवकर, उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने