शिरपूर : आर. सी. पटेल पॉलिटेक्निक मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानाअतंर्गत डिजीटल साक्षरता अभियानाची सुरवात झाली.
सध्या संपूर्ण देशातील वेगवेगळ्या संस्था स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानाअर्तंगत विविध उपक्रम राबवित आहेत, याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने राज्यस्तरीय डिजीटल साक्षरता अभियान राबविण्यासाठी आर. सी. पटेल पॉलिटेक्निकची निवड केली आहे.
या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये डिजीटल साक्षरता वाढवणे हा असून त्यांना विविध शासकीय योजना, दाखले, ऑनलाईन सातबारा, पिकविमा, विविध बाबतीत असलेले शासकीय अनुदान या संदर्भात ऑनलाईन व डिजीटल पध्दतीने लाभ कसा घेता येईल याचे मार्गदर्शन करणे तसेच मोबाईल बँकीग आपले सरकार व इतर ऑनलाईन सेवांची माहीती देवून जागरुकता वाढविणे हा आहे.
सदर कार्यक्रम अंतर्गत सुरवातीला जे विद्यार्थी स्वेच्छेने या कार्यक्रमात भाग घेऊन ग्रामीण भागातील लोकांमध्ये डिजीटल साक्षरतेचा प्रचार आणि प्रसार करण्यास तयार आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले व आता हे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचून हा उपक्रम राबविणार आहेत. सदर उपक्रम १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत नियमीत चालणार असून एखाद्या गावातील लोकांना हा उपक्रम त्यांच्या गावात स्वेच्छेने आयोजीत करावयाचा असल्यास त्यांनी महाविद्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन प्राचार्य डॉ. नविन हासवाणी यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा.हुजेफा शेख, संदीप पाटील, मतीन पठाण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रा. डॉ.नविन हासवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत आहेत.
Tags
news
