धुळे येथील एस.व्ही.के.एम. इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी येथे तीन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्र संपन्न




धुळे : येथील एस.व्ही.के.एम. इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी येथे "फ्युचर प्रॉस्पेक्ट्स ऑफ इंडियन फार्मासिस्ट इन्व्हिजनड बाय इ.आर. 2020" या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन दि. २२ फेब्रुवारी २०२२ ते २४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान फार्मसी शाखेतील संशोधक, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ उपसचिव अक्षय जोशी, तांत्रिक उपसंचालक अमोल न्यायनीत (तंत्रशिक्षण संचालनालय क्षेत्रीय कार्यालय नाशिक) यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे संयोजक व प्राचार्य डॉ. समीर गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रथम सत्रात समीर कोरे (एच.आर. प्रमुख, नोव्हार्टीस टेक्निकल ओप्स ऍट नोव्हार्टीस) यांनी "एच.आर. एक्स्पेक्टिशन फ्रॉम डी.फार्मसी कोर्स अँड स्टुडंट्स" या विषयावर तसेच श्रीमती पल्लवी चव्हाण (सिनियर फार्मासिस्ट मुंबई मनपा) यांनी "इन्साईट अबाऊट द प्रायमरी अँड प्रिव्हेंटिव्ह हेअल्थकेअर कॉन्सेप्ट्स इन सोशिअल फार्मसी" या विषयावर, जगन्नाथ शिंदे (एक्सिकेटीव्ह कमिटी मेंबर, महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिल) यांनी "रोल्स ऑफ फार्मासिस्ट फ्रॉम डिस्पेन्सर ऑफ मेडिसिन्स टू मेडिसिन एक्स्पर्ट" या विषयावर मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रात डॉ. रेमेथ  डिआस (हेड, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड, सातारा) यांनी "एक्सपेरिएन्शिअल लर्निंग थ्रू ट्युटोरिअल्स, असाइनमेंट अँड फिल्ड व्हिजिट्स" या विषयावर, विजय पाटील (प्रेसिडेंट, महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिल) यांनी "रोल्स ऑफ डिप्लोमा होल्डर्स इन कॉम्युनिटी अँड हॉस्पिटल फार्मसी" या विषयावर तर डॉ. विवेक बोरसे (डी.एस.टी.इन्स्पायर फॅकल्टी, डिपार्टमेंट ऑफ मेडिकल डिव्हायसेस, नायपर, हैद्राबाद) यांनी एज्युकेशन रेग्युलेशन्स २०२० अँड एन.इ.पी. या विषयावर, डॉ. योगेश्वर बच्छाव (असो. डायरेक्टर, फार्मास्युटिकल डेव्हलोपमेंट अँटी इंफेक्टिव्ह क्युअर्स, जर्मनी) यांनी "करंट प्रॅक्टिस स्टँडर्ड्स अँड अपकमिंग चेंजेस इन हेल्थ केअर सेक्टर" या विषयावर मार्गदर्शन केले.
तृतिय सत्रात डॉ. प्रशांत अरगडे (हेड, गव्हर्नमेंट पॉलीटेकनिक, जळगाव) यांनी "कोर्स आऊटकम डिझाईन असेसमेंट क्रायटेरिया मॉडेलिटीज अँड पॅरामीटर्स" या विषयावर, डॉ.आर.एन. गुप्ता (व्हाईस प्रेसिडेंट, इंडियन फार्मास्युटिकलस असोसिएशन अडजंक्ट प्रोफेसर नायपर, कोलकाता) यांनी "प्रोफेशनल फार्मसी प्रॅक्टिस इन कॉन्टेक्स्ट टू सोसायटी अँड एन्व्हायर्नमेंट" या विषयावर, ऑस्कर वाझ (सिनियर मॅनेजर एच. आर. अपोलो फार्मसी- अपोलो हॉस्पिटल्स एन्टरप्राइझेस लिमिटेड) यांनी "कॉम्पेटन्सीज फॉर इंडियन डी फार्महोल्डर्स" या विषयावर मार्गदर्शन केले.  सदर व्याख्याते प्रामुख्याने आपापल्या विषयातील संशोधनात अग्रेसर असून त्यांचे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रकाशित झाले आहेत. या चर्चासत्रात तीनशे तहून अधिक फार्मसी विभागातील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. 
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.चेतनकुमार सोनवणे (विभाग प्रमुख, डिप्लोमा इन फार्मसी), प्रा.नंदकिशोर तलवारे, प्रा.तोष पाटील, प्रा.एम.एच.शेख, प्रा. रेवती देवरे, प्रा. कामिनी मोरे व प्रा. अमृता अमृतकर, गिरीष पाटील, भूषण पाटील, दिनेश पाटील, विरेंद्र पिसोळकर  यांनी प्रयत्न केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने